कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India.

Apply for Educational-Loan-Online-in-India आजच्या आधुनिक युगात इंटरनेटमुळे अनेक बदल होत आहे आणी असेच बादल येणार्‍या युगात होत राहणार आहे.असाच बादल आजच्या शैक्षणिक/ शिक्षण क्षेत्रात झाला आहे.ज्यामुळे विध्यार्थी तसेच पालकांपुढे नवनवीन खर्च हे उभे राहत आहे.भरपूर पालक तसेच विध्यार्थी मित्रांची परिस्थिती हे खर्च परवडणारी नसते.हा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी अनेक विध्यार्थी  मित्र काम करून पैसे हे भरत असतात.त्यामुळे याचा प्रभाव त्यांच्या शैक्षणिक करियरवर पडत असतो.अशा परिस्थिती एक नवीन मार्ग म्हणजे शैक्षणिक कर्ज.


education loan process in india भारतातील अनेक बँका ह्या विविध प्रकारची कर्जे आपल्या ग्राहकांना देत असतात.त्यातीलच एक कर्जाचा प्रकार म्हणजेच शैक्षणिक कर्ज होय.आता अशा प्रकारचे देखील एक कर्ज असते याबद्दल अनेक लोकांना अजून माहिती नाहीये.अशा विध्यार्थी मित्रांसाठी आजच्या लेखात शैक्षणिक कर्ज म्हणजे काय ? , शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे ? , शैक्षणिक कर्जाचे प्रकार ?,शैक्षणिक कर्जाचे घटक,व्याजदर ,पात्रता,आवश्यक कागदपत्रे. इ. विषयांची माहिती आज या लेखात घेणार आहोत. लेख आवडल्यास इतर मित्रांना फॉरवर्ड करायला विसरू नका.


शैक्षणिक / शिक्षण कर्ज म्हणजे काय आहे ? What is Educational Loan?

 शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी विध्यार्थी तसेच पालकांनी घेतलेल्या कर्जाला शैक्षणिक कर्ज (Educational Loan)असे म्हणतात.प्रामुख्याने शैक्षणिक कर्जाचा हेतु हा पुस्तके,क्लासेस,कॉलेज फी तसेच हॉस्टेल खर्च भागवणे हा आहे.शैक्षणिक कर्ज हे 12 वी नंतर म्हणजेच माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी घेतली जातात.शैक्षणिक कर्ज घेतल्यामुळे विध्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाचा खर्च हा भागवला जाऊ शकतो.


शैक्षणिक कर्जाचे प्रकार education loan process

बँकामार्फत विध्यार्थ्यांना 2 प्रकारची कर्जे दिली जातात,म्हणजेच देशांतर्गत शिक्षणासाठी कर्ज आणि विदेशी शैक्षणिक कर्ज.त्यांची माहिती आपण खाली घेणार आहोत.

हे देखील वाचा »  5 लाखांपर्यंत दवाखाना फ्री -प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना

1. देशांतर्गत शैक्षणिक कर्ज -

 education loan process याच्या नावावरून तुम्हाला समजले असले की देशांतर्गत शैक्षणिक कर्ज हे देशामध्ये जे शिक्षण घेण्यासाठी बँका याद्वारे कर्ज देत असतात.एखाद्याला देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी कर्ज हवे असल्यास बँका डोमेस्टिक एजुकेशन लोन (कर्ज) वितरित करते.या कर्जाचा व्याजदर हा कमी असतो.या कर्जावरील व्याजदर हा ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या नियमांनुसार असतो.


2. विदेशी शैक्षणिक कर्ज -

education loan process आजच्या युगात जर अधिक उच्च शिक्षा घ्यायचे असल्यास विध्यार्थी विदेशी शिक्षण घेणे पसंत करतात.अशावेळेस खर्चाची गरज पूर्ण करण्यासाठी या प्रकारची कर्ज बँका ग्राहकांना देत असतात.विदेशी कर्जाचे व्याजदर हे देशांतर्गत शैक्षणिक कर्जापेक्षा अधिक असतात तसेच संबंधित बँकेच्या नियमावर देखील अवलंबून असतात.एखाद्या विध्यार्थ्याला दुसर्‍या देशात शिक्षण पूर्ण करायचे असल्यास तो हे कर्ज घेऊ शकतो.

हे देखील वाचा »  मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी जमावा 75 लाख रु सरकारची योजना

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी अटी education loan eligibility

  1. विध्यार्थी भारताचा नागरिक असावा.
  2. विध्यार्थ्याचे वय 18 ते 35 असायला हवे.
  3. ज्या ठिकाणी विध्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे तेथील प्रवेश कन्फर्म केलेली पावती
  4. विध्यार्थ्याचे माध्यमिक शिक्षण म्हणजेच 12 पर्यंतचे शिक्षण पूर्ण असायला हवे.
  5. माध्यमिक शिक्षणाची टक्केवारी चांगली असला हवी.
  6. विध्यार्थ्याचे शैक्षणिक बॅकग्राऊंड ऊतम असायला हवे.

बँकाच्या कर्जाचे व्याजदर education loan interest rate

भारतात 30 पेक्षा अधिक बँका आहेत ज्या शैक्षणिक कर्ज देतात.तसेच प्रत्येक बँकेची काम करण्याची कार्यप्रणाली देखील वेगवेगळी आहे.त्यामुळे बँकेत एकसारखाच व्यदर आढळून येत नाही.प्रत्येक बँकेचे नियम आणि व्याजदर देखील भिन्न आहेत.विध्यार्थी किती कर्ज घेत आहे,किती कलावधीसाठी घेत आहे ? यावर त्या बँकेचे व्याजदर अवलंबून असतात.


शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे education loan documents

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड /पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स /मतदान कार्ड /रहिवासी दाखला /विजेचे बील
  3. स्वतः चे पासपोर्ट आकाराचे फोटो
  4. प्रवेश परीक्षेचा निकाल
  5. Admission कन्फर्म पावती
  6. शिक्षण संस्थेचे पत्र
  7. कोर्सच्या फी चा संपूर्ण आराखडा
  8. या आधी कर्ज घेतले असल्यास त्याची कागदपत्रे
  9. बँक अकाऊंट
Previous Post Next Post